चारपैकी एकही मतदारसंघ न सुटल्याने नाराजी

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत शहरातील चारपैकी एकाही मतदारसंघात कॉग्रेस पक्षाला जागा न सोडण्यात आल्याने कॉग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत नाशिक शहरातील महात्मा गांधी रोडवरील पक्ष कार्यालय असलेल्या कॉग्रेस भवनाला कुलूप ठोकले. दलित मुस्लिमबहुल मतदारसंघ असलेला मध्य नाशिक मतदारसंघ कॉग्रेस पक्षासाठी अनुकूल होता मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मध्य मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आला मुख्य म्हणजे याबाबत स्थानिक नेते, कार्यकर्ते यांना याबाबत कुठलीही कल्पना नव्हती अखेर स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कॉल करून विचारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. मग आता नाशिकला जागा सोडणे शक्य नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. जर चार पैकी एकही मतदारसंघ कॉग्रेसला सुटत नसेल आणि याबाबत नेत्यांना अपयश येत असेल तर शहरात पक्षच संपून जाईल असा संताप कॉग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी या आंदोलनात कॉग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, सुरेश मारू, उद्धव पवार, विजू पाटील, कैलास कडलग, भारत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, जुली डिसुझा, जयेश पोकळे, जावेद पठाण, देवाभाऊ देशपांडे, कैलास महाले सहभागी झाले होते. कॉग्रेस पक्षाला एकही जागा न सुटल्याने नाराज झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आज सकाळी 12 वाजता श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे

![]()












