मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का ?

नाशिक : राज्यात महायुती सत्तेच्या खुर्ची जवळ पोहचल्यावर मुख्यमंत्री कोण होणार ? या चर्चेत काही दिवस गेले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला दिल्लीत गेल्यानंतर ते तडक आपल्या मूळ गावी निघून गेले यादरम्यान महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची आम्हाला माहितीच नव्हती असे देखील शिंदे गटाच्या शिवसेनेने स्पष्ट केल्यानंतर महायुतीत सर्वच अलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले कारण एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करा असा त्यांच्या आमदारांचा आग्रह आहे तर भाजप आमदार म्हणतात आमच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने आमचाच मुख्यमंत्री होणार असे म्हणतात अजूनही भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट नाही त्याचबरोबर भाजप धक्कातंत्रात माहिर असल्याने ऐनवेळी काय घडेल हे सांगता येणे अशक्य असून चर्चा तर देवेंद्र फडणवीस यांचीच असून तेच मुख्यमंत्री असू शकतात. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे अजूनही पूर्ण मंत्री-मंडळ व कोणती खाती कोणाला हे ठरत नसल्याने उद्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होण्याची सूत्रांची माहिती आहे. या शपथविधी नंतर कोणती खाती कोणत्या पक्षाला जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याठिकाणी गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री या वरून वाद असल्याचे समजते. गृहमंत्रीपद मुख्यमंत्री यांच्याकडेच असावे यासाठी भाजप आग्रही आहे जर असे झाले तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होऊन नगरविकास ,एमएसआरडीसी ही महत्त्वाची खाती स्वतःच्या शिवसेनेकडे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्याचबरोबर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावे असा दबाव त्यांच्या आमदारांचा असून ते मंत्रिमंडळात असणे गरजेचे आहे असा आमदारांचा सल्ला आहे. उद्या होणाऱ्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर झाली असून संध्याकाळी 5 वाजता होणारा शपथविधी राज्यातील बसस्टॉप,एसटी आगार, तसेच प्रशासनाने लावलेल्या सर्व एलईडी स्क्रीनवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 30 ते 40 हजार लोक येथे अपेक्षित आहेत. लाडक्या बहिणीसाठी राखीव आसन व्यवस्था करण्यात आली आहे असे देखील समजते या शपथविधीला साधुसंतांची देखील उपस्थिती राहणार आहे


![]()












