• Latest
  • Trending
उद्यापासून काय स्वस्त; काय महाग? 

उद्यापासून काय स्वस्त; काय महाग? 

September 21, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

उद्यापासून काय स्वस्त; काय महाग? 

YOU MAY ALSO LIKE

मनपा कडून नोटिसा आणि साधू-महंतांचा संताप

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

देशभरात उद्यापासून जीएसटीचे नवी कररचना

नाशिक : देशभरात जीएसटीची नवी कर रचना लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीची नवी कररचना लागू होणार असल्याची माहिती दिली. देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत ऐतिहासिक बदल घडवणारी ‘वस्तू आणि सेवा कर (GST) २.०’ सुधारणा उद्या, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. नवीन तरतुदींनुसार, आता फक्त दोन मुख्य जीएसटी दर असतील  ५ टक्के आणि १८ टक्के. या बदलामुळे अनेक दैनंदिन गरजांच्या वस्तू आणि गृहपयोगी उपकरणे स्वस्त होणार आहेत.या सुधारणांचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.    या वस्तू होणार स्वस्त……….. सध्या १२ टक्के दराने कर आकारला जाणारी टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, बिस्किटे, स्नॅक्स, ज्यूस, तूप आणि लोणी यांसारखी पॅकेज्ड उत्पादने आता ५ टक्के दराच्या स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बचतीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, सायकली, स्टेशनरी वस्तू, परवडणारे कपडे आणि पादत्राणे देखील स्वस्त होणार आहेत.वाहन आणि गृहनिर्माण क्षेत्रालाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. १२०० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या छोट्या गाड्यांवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर आकारला जाईल. त्यामुळे मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांना फायदा होईल. दुचाकी वाहने देखील स्वस्त होणार आहेत. सध्या २८ टक्के दराने कर आकारला जाणारी एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर आणि मोठ्या स्क्रीनचे टीव्ही यांसारखी घरगुती उपकरणे आता १८ टक्के स्लॅबमध्ये आल्याने ती ७-८ टक्क्यांनी स्वस्त होतील. सिमेंटवरील जीएसटी कमी झाल्यामुळे बांधकाम आणि गृहनिर्माणालाही चालना मिळेल.

या वस्तू महाग होणार…….
जीएसटी २.० लागू झाल्यामुळे सर्व काही स्वस्त होणार नाही. तंबाखू उत्पादने, अल्कोहोल, पान मसाला, ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म यांसारख्या ‘वर विशेष ४० टक्के कर स्लॅब लागू होईल. यामुळे या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलला अद्याप जीएसटीच्या कक्षेत आणले नसल्याने इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. हिरे आणि मौल्यवान दगडांसारख्या लक्झरी वस्तूंवरही जास्त कर आकारला जाईल. पंतप्रधान यांचा नारा……पंतपधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा देखील नारा दिलाय. स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय. स्वदेशी वस्तूंचा गर्व बाळगण्याचा सल्ला देखील मोदींनी दिलाय.

Loading

Previous Post

गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक 

Next Post

नाशकात बिबट्याने दोन वर्षांच्या मुलाला फरफटत नेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White