
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक त्रंबकेश्वर दौऱ्यावर असतानाच नासिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले पत्नीचे निधन झाल्याचे समजतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले ( वय 40) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शनिवारी सकाळी निधन झाले. आदिती ढिकले यांच्यावर सायंकाळी 5:30 वाजता गणेश वाडी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आदिती ढिकले यांची शुक्रवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे आमदार राहुल ढिकले यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे शासकीय कार्यक्रमानिमित्त त्रंबकेश्वरच्या दौऱ्यावर आले होते. गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांना दुखद घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढिकले यांच्या निवासस्थानी धाव घेत अदिती ढिकले यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे,आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आदींसह अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्लॅक अँड व्हाईट मीडियाच्या वतीने आदिती ढिकले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

![]()












