• Latest
  • Trending
“आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना “

“आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना “

December 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना “

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

अजित पवार यांच्या विरोधात छगन भुजबळ बंडाचे निशाण फडकवणार का ?

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तार झाला यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यामध्ये कायमच अडचणीच्या काळातअजित पवारांना साथ देणारे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून लांब ठेवत त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याने छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाल्याचे चित्र असून माध्यमांबरोबर संवाद साधताना भुजबळ म्हणाले जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे त्यांनी म्हटल्यावर भुजबळ यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारता का ? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. मात्र काही दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असे म्हटले. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तेव्हा तुम्हाला येवल्यातून लढलं पाहिजे, असं सांगण्यात आले. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमानं पुढं जाईल, असं सांगितलं गेलं. माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. त्यासाठी लगेच मला राजीनामा दयावा लागेल मगच मी राज्यसभेवर जाऊ शकतो मात्र ही माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. मला ज्यांनी प्रेम दिलं त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.त्याचबरोबर मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली- गेली…भुजबळ कधी संपला नाही, असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं.असेही ते म्हणाले तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. आता पुढची भूमिका काय असेल? असे पत्रकारांनी विचारले असता “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळांनी केले. त्यामुळे ते बंडाचा झेंडा उभारणार का अथवा राष्ट्रवादी पक्षात राहून संघर्ष करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्याची खेळी ?

Next Post

भाजप आमदारांचे काय चुकले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White