• Latest
  • Trending

आता “पश्चिम”ची लढत होणार तिरंगी

October 24, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आता “पश्चिम”ची लढत होणार तिरंगी

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

आमदार हिरेंन समोर बडगुजर आणि दिनकर पाटील यांचे तगडे आव्हान !

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपाला सुरवात झाली. अनेक जागांवर रस्सीखेच तर कुठे मित्र पक्षांची आक्रमकता यामध्ये अजूनही जागा वाटपाचा खेळ सुरूच आहे .त्यामुळे अनेक मतदारसंघातील कोड सुटत नसताना नाशिक पश्चिम मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे . आधी दुरंगी वाटणारी पश्चिमची लढत आता तिरंगी होत आहे. भाजपने आपल्या पहिल्याच यादीत विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिली मुख्य म्हणजे विद्यमान आमदार सीमा हिरे यांना स्वकीयांनकडूनच उघड विरोध होऊनदेखील याकडे कानाडोळा करत पक्षाच्या प्रमुखांनी हिरे यांना संधी दिली. हिरेच्या उमेदवारीला विरोध करणारे मा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सरळ सोशल मीडियावर या उमेदवारीचा निषेध नोंदवला तर दुसरे नगरसेवक शशिकांत जाधव हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याचे समजते त्यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला असून ते बंडखोरी करतात की पक्ष त्यांची समजूत काढतो हे कळेलच त्याचबरोबर कैलास आहेर, प्रदीप पेशकार व इतर इच्छुक काय भूमिका घेतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे तर हिरेच्या उमेदवारीला जोरदार विरोध करणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभेत देखील माघार घेतली होती आता मात्र हिरेंना उमेदवारी मिळाल्याचे बघताच त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत आता खूप झाले.. म्हणत त्यांनी सरळ मुंबई गाठत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत उमेदवारी पटकावली .त्यापाठोपाठ कालच ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पहिल्याच यादीत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने आता पश्चिम मतदारसंघात महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित असून आता भाजपातील इतर इच्छुक असणारे बंडखोरी करतात की पक्ष त्यांना थंड करतो हे काही दिवसात कळेलच मात्र black and white न्यूज ने पश्चिम मतदारसंघात बंडखोरी होणारच ही बातमी टाकली होती ती खरी ठरली.

Loading

Previous Post

भाजपाच्या अण्णांच्या हाती “मनसे”चा झेंडा

Next Post

“मध्य” साठी कॉग्रेस मध्ये नाराजीचे फटाके !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White