माघारीचा शेवटचा दिवस, कोण मैदानात चित्र होणार स्पष्ट

नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवार शेवटचा दिवस आहे त्यामुळे बंडखोरांना थोपवण्यास सर्व पक्षीय नेत्यांना यश येणार का ? हे आज दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्याही मोठी होती. पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांत इच्छुकांनी बंड केले, तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले. अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्याने हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील होते. नाशिक शहरातील मतदार संघातील मध्य मतदारसंघात सर्वात जास्त बंडखोर उमेदवार उभे आहेत यामध्ये कॉग्रेसच्या बंडखोर डॉ हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याने त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुशीर सय्यद हे मैदानात उतरले असून ,गुलजार कोकणी,हनिफ बशीर यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे आज माघार कोण घेणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्याशी भाजप वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू होती त्यानंतर मनसे दोन मतदारसंघात मनसे माघार घेणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये मनसेचे मध्य नाशिक मतदारसंघातील उमेदवार अंकुश पवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अंकुश पवार हे मुंबईत ठाण मांडून बसले असून मनसेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे समजते. अंकुश पवार यांच्या माघारीमुळे भाजपच्या मध्यच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना फायदा मिळू शकतो तर मुंबईतील काही जागांवर भाजप मनसेला मदत करू शकते त्याचबरोबर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे माघार घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे लक्ष लागून आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवार उद्धव निमसे, पश्चिम मतदारसंघातील शशिकांत जाधव, मा नगरसेवक मुकेश शहाणे, मध्य मधील सुरेश पाटील लक्ष्मण सावजी या नाराज नेत्यांबरोबर भाजप संकटमोचक गिरीश महाजन यांची चर्चा झाली असून त्यांचे बंड थंड झाल्याचे समजते मात्र खरे चित्र आज 3 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे .

![]()











