
नाशिकरोड : येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे आयोजित उन्हाळी जलतरण शिबिराला विद्यार्थी वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. यादरम्यान जलतरण शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थींचा पारीतोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे अनिल जगताप, डॉ भंडारी सर, हरी सोनकांबळे सर, प्रशिक्षक शंकर मादगुंडी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई,ठाणे येथे झालेल्या प्रथम राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा विजेत्या झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
सदर विद्यार्थीना तरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, प्रशिक्षक राजू वाईकर, प्रितम भडांगे, रवी ठाकरे, विकास सर, अशोक गवारी, आदींसह इतर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()














