महाविकास आघाडी समर्थकांसह फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप करत आनंदोत्सव

नाशिक ः आम आदमी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजुर झाल्यानंतर जल्लोष साजरा करताना आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी.
नाशिक ः आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने आम आदमी पार्टी नाशिक शहर व इंडिया आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपसस्थितांना पेढे वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी व ‘जेल के ताले तुट गये, केजरीवाल छुट गये’ घोषणा देत साजरा करण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संघटन मंत्री नविंदर सिंग अहलुवालिया, नाशिक शहरअध्यक्ष अमोल लांडगे, श्वेतांबरी आहेर, निर्मला दाणी, शांताबाई बनकर, रेखा गोसावी, सुमीत शर्मा, योगेश कापसे, अमर गांगुर्डे, जगमेरसिंग खालसा, साहिल सिंग, रोहित पाटील, ॲड. बाळासाहेब गटकळ, विकास पाटील, आनंद पगारे, विश्वजीत सावंत, विलास मोरे, शुभम पडवळ, प्रदीप लोखंडे, गिरीश उगले-पाटील, गोरख मोहिते, कलविंदर गरेवाल, स्वप्नील घिया, अभिजित गोसावी, संजय कातकाडे, अॅड. प्रभाकर वायचळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख यांसह महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी हर्षद भाई पटेल, बाळासाहेब बडवे, शैलेश सूर्यवंशी, सुनील निरगुडे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कॉ. महादेव खुडे, कॉ. डॉ. रामदास भोंग यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सवात सहभाग नोंदविला.
![]()














