• Latest
  • Trending

नाशिक लोकसभेचा तिढा अखेर सुटला, उद्या होणार घोषणा….

April 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक लोकसभेचा तिढा अखेर सुटला, उद्या होणार घोषणा….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

कुठल्याही पक्षाला जागा सोडा मात्र निर्णय लवकर घ्या–छगन भुजबळ

नाशिक :लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक महिना पूर्ण झाला. मात्र या संपूर्ण महिनाभरात लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी घोषणाच झाली नसून अद्यापही संभ्रम कायम आहे. ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि उमेदवार कोण याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असताना नाशिक शहरात उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत महायुतीचा उमेदवार घोषित होणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र महायुतीकडून उमेदवार कोण ? याबाबत खलबते सुरू आहेत. सुरवातीला शिंदे गटाला मिळणारी जागा नंतर अवघड वाटू लागली यादरम्यान नाशिक लोकसभेसाठी खा. श्रीकांत शिंदे यांनी सरळ शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांची घोषणाच करून टाकली. त्यानंतर भाजपाने दावा करत नाशिक लोकसभेवर दावा सांगितला या दोन पक्षांचे भांडण सुरू असताना यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उडी घेतली यामध्ये छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले मुख्य म्हणजे केंद्रातील भाजपा नेत्यांनीच या नावावर जोर दिला. अशी चर्चा होती. त्यानंतर भुजबळांना विरोध मग हेमंत गोडसेंच शक्तिप्रदर्शन या सर्व घटना नाशिकरांनी बघितल्या त्यातच भाजपा कडून दिनकर पाटील, राहुल ढिकले यांचे नाव चर्चेत आले तर शिंदे गटातून अचानक अजय बोरस्ते यांचे देखील नाव आघाडीवर होते. या दरम्यान ठाकरे गटाचे नाराज असलेलेविजय करंजकर यांचे नाव देखील चर्चेत राहिले मुख्य म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा बोलावून सुद्धा विजय करंजकर हे ठाकरेंना न भेटल्याने त्यांनी नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाची वाट तर नाही ना निवडली याबाबत जोरदार चर्चा आहे. आज श्री राम नवमी निमित्त श्री काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतल्यानंतर छगन भुजबळ प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना म्हणाले कुठल्याही पक्षाला जागा सोडा मात्र 20 मे च्या आधी काय तो निर्णय घ्या, जागा कुठल्याही पक्षाला सुटली तरी महायुती म्हणून प्रचार करणार असल्याचे भुजबळ म्हणाले, यावेळी दर्शनासाठी आलेल्या हेमंत गोडसे यांनी देखील भुजबळांचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले उद्या नाशिक शहरात आमची महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद असून यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित होणार असल्याचे ते म्हणाले.याबाबत मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा झाली असल्याचेही केसरकर म्हणाले.

Loading

Previous Post

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नाशिक पोलिसांची करडी नजर….

Next Post

नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेच असणार का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White