शरद पवार गटाला मोठा धक्का..


जळगाव : भाजपमध्ये जाण्याचे अजून तरी प्रयोजन नाही असे सांगणारे शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. दरम्यान खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृह मंत्री अमित शहा यांच्या सोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती मात्र त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वतःच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच… एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी त्यांच्या कन्या व शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अँड रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटांमध्येच राहणार आहेत याबाबतची माहिती त्यांनी दिली.
![]()











