विजदरवाढीबाबत प्रत्येक राज्यात वेगळे दर

नाशिक :महावितरण कंपनीने केलेली सुमारे दहा टक्के वीज दरवाढ अन्यायकारक आहे. राज्यातील अन्याय औद्योगिक संघटनांची चर्चा करून भूमिका समान असल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. असा निर्णय निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महावितरण ने केलेल्या दरवाढीबाबत विचार विनिमय करण्यासाठी निमात बैठक घेण्यात आली. एक देश एक कर अशा पद्धतीने जीएसटी ची अंमलबजावणी करत असताना विजेच्या दराच्या बाबतीमध्ये मात्र प्रत्येक राज्यांमध्ये विजेचे वेगवेगळे दर आकारल्यामुळे अनेक उद्योजक स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही. महावितरण कंपनीच्या आड मुठे धोरणामुळे व सातत्याने नियमक आयोगाकडे चुकीची माहिती देऊन दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढ हीच मुळात मान्य नाही यामध्ये निमाच्या राज्यभरातल्या औद्योगिक संघटनांच्या याचिका प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित असताना सुद्धा अशा पद्धतीने ही दरवाढ करणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला याबाबत लवकरात लवकर राज्यातील अन्य औद्योगिक संघटनाची चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. चर्चेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, निखिल पांचाल, आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, प्रमोद वाघ, गोविंद झा, राजेंद्र अहिरे आधी निमा पदाधिकारी व सभासद उपस्थित होते

![]()















