रेडिरेकनर दरात यावर्षी देखील वाढ नाही

मुंबई : लोकसभा व राज्य विधानसभा निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीचा विचार असेल तर जरूर अमलात आणता येईल. कारण यावर्षी राज्यात रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हे दर जैसे थे आहेत. 2023- 24 या आर्थिक वर्षात रेडी रेकनर चे जे दर होते ते 2024- 25 साठी कायम असतील त्यामुळे बांधकाम क्षेत्र आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 2022- 23 या आर्थिक वर्षात दरात पाच टक्के वाढ करण्यात आली होती. 2023- 24 या वर्षात सरकारला 50 हजार कोटींचा महसूल रेडीरेकनरच्या माध्यमातून मिळाला.
![]()















