मनसेचा आंदोलनाचा इशारा

नाशिक- : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमीत त्यांच्या चित्रपटावर अन्याय केला जात आहे. हा चित्रपट प्राईम टाईम मध्ये दाखवण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी सकाळी नऊ आणि रात्री अकरा वाजता अशी सहसा प्रेक्षकांना जमणार नाही अशी वेळ मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी ठेवली आहे. नियमानुसार हा चित्रपट प्राईम टाईम मध्ये नसल्यास खळखट्याक करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चित्रपट हा प्राईम टाईम मध्ये दाखवला पाहिजे असे शासनाचे आदेश आहेत शासनाचा जीआर नुसार सकाळी नऊ ते दुपारी 12 तसेच दुपारी बारा ते तीन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ किंवा रात्री नऊ ते रात्री बारा अशी वेळ गृहीत आहे मात्र मल्टिप्लेक्स चालकांनी त्याची वेळ सकाळी नऊ तसेच रात्री 11 अशी विचित्र ठेवली आहे. हा कोणत्या राजकीय गटाचा भाग आहे का ?अशी शंका या निमित्ताने मनसेने घेतली आहे. त्यामुळे शासन नियमानुसार स्वातंत्र्य वीरसावरकर यांच्या जीवनावरील चित्रपट प्राईम टाइम च दाखवावा अन्यथा मनसे कडून खळखटक आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात मनसेने मल्टिप्लेक्स चालकांना निवेदन देखील दिले आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके निखिल सरपोतदार, रोहन जगताप, अमित गांगुर्डे, अर्जुन वेताळ,दिपचंद केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते
![]()














