शिंदे गटानंतर नाशिक भाजपा इच्छुक व पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी धडक,खा. गोडसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त…..

नाशिक :लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी महायुतीमध्ये जोरदार घमासान सुरू असून आधी शिंदे गट त्यानंतर भाजपा आणि मनसेच्या एंट्रीमुळे नाशिक लोकसभेची जागा ही हॉटस्पॉट बनत चालली आहे. कालच शिंदे गटाच्या ठाणे येथील शक्ती प्रदर्शना पाठोपाठ आज भाजपाच्या इच्छुकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी धडक दिली. नाशिकची जागा आता पक्षाला मिळाली नाही तर हा पायंडा पडत जाईल असे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. सोमवारी दुपारी निघालेले नाशिकचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सागर या बंगल्यावर धडक दिली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नाशिकची जागा यापूर्वी भाजपाकडे होती. कै. दौलतराव आहेर भाजपाचे शेवटचे खासदार होते त्यानंतर नाशिक मध्ये भाजपाची ताकद प्रचंड वाढली तर आहे शिवाय आयोध्यातील श्री रामचंद्राच्या मंदिर निर्माणामुळे राम भूमी असलेले नाशिक हिंदुत्वाला अनुकूल असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे भाजपामुळे निवडून येतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे नेते अमित शहा किंवा राज्यातील नेत्यांची आणि स्थानिक नेते आमदारांचे फोटो कधी आपल्या पालकावर वापरत नाहीत. अशी तक्रार यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार डॉ राहुल आहेर आमदार अँड राहुल ढिकले जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव लोकसभा प्रमुख केदा आहेर, गणेश गीते, महेश हिरे, दिनकर पाटील ,सुरेश पाटील, मंडल अध्यक्ष भगवान काकड, अविनाश पाटील, रवींद्र पाटील अँड अरुण खंडबहाले, कुणाल वाघ, अमोल पाटील, अनिल जाधव, अजय दराडे, सोनाली कुलकर्णी, आदी उपस्थित होते दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेवर दावेदारी केली होती त्यामुळे जागेचा तिढा वाढत असल्याचे दिसताच शिंदे गटाने हातची जागा जाऊ नये यासाठी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुसऱ्याच दिवशी भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेत मुंबईला धडक दिली. आता जागा वाटपात काय होते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे

![]()











