सिनेस्टाईल पद्धतीने कारचा पाठलाग

नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप 122 जागा स्वबळावर लढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू आहे उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांचा संताप झाला आहे. या संतापाचा उद्रेक नाशिकमध्ये बघायला मिळाला. भाजप पक्ष प्रवेश केलेल्यांना ऐनवेळी उमेदवारी मिळत असल्याने भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांना अनेक ठिकाणी उमेदवारी डावलण्यात आली. त्यातूनच आज नाशिक शहरात थरारक प्रसंग घडला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग केला. एबी फॉर्म घेऊन नेते उमेदवारांना फॉर्म देणार होते. मात्र इच्छुकांनी फॉर्म देणाऱ्या भाजप शहरअध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग केला हा थरार नाशिक मुंबई महामार्गावर रंगला होता या वाहनात आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे असल्याची माहिती मिळत असून हे पाठलाग करणारे इच्छुक उमेदवार नाशिकच्या सिडको विभागातील असल्याचे समजते.काही वेळात ही कार एका फार्म हाऊस मध्ये घुसली यादरम्यान गेट लावण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांनी गेटवर लाथा मारण्याचा देखील प्रयत्न केला .अगदी सिनेस्टाईल पद्धतीचा हा राडा होता. नाशिकच्या रस्त्यावर एबी फॉर्म पळवा पळवीचे दृश्य आज नागरिकांना दिसले. त्या गाडीच्या मागे इच्छुक उमेदवारांच्या गाड्या वेगाने धावत होत्या. या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

![]()















