सोशल मीडियावर व्हिडिओ जोरदार व्हायरल

नासिक : त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निकालानंतर एक उमेदवार मतदारांच्या घरोघरी पोहोचत आहे तर तो आभार मानण्यासाठी नव्हे तर वेगळ्या कारणासाठी याच कारणाची चर्चा सध्या सोशल मीडियात जोरदार सुरू असून त्याचा तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक रिंगणात उभे असलेल्या एका उमेदवाराने मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सोने वाटप केले होते मात्र या उमेदवाराचा पराभव झाला आपला पराभव जिवावी लागलेल्या या उमेदवाराने आता मतदारांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारण्याची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ते सोने परत करा म्हणून हा उमेदवार मतदारांच्या मागे लागला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओत तो उमेदवार एका गल्लीत काही लोकांशी भांडतांना दिसत आहे. माझ्या घरातून नेलेले सोने परत करा असे तो संतापून म्हणत आहे. तर निवडून आल्याने अशा प्रकारे घरी येऊन सोने परत मागणे हे कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल मतदार त्याला विचारताना दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मधील ही घटना सध्या चांगली चर्चेत आली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होत आहे. तर सोशल मीडियावर काही नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया येत असून मतदारांनी अशाप्रकारे आमिषाला बळी पडणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे. तर काहींनी पराभूत उमेदवाराच्या या कृतीची खिल्ली उडवली आहे.

![]()















