• Latest
  • Trending
वाढती गुन्हेगारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

पोलीस आयुक्तांचा दणका आणि ‘गुंड’ अंडरग्राउंड

October 10, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पोलीस आयुक्तांचा दणका आणि ‘गुंड’ अंडरग्राउंड

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

राजकारणात नव्याने येऊ पहाणाऱ्या गुंडांना पोलिसांचा धसका

नाशिक: या वर्षातील हत्यांची संख्या ४6 पर्यंत पोहचल्यावर आणि गुन्हेगार आपल्या भाईगिरीची रील सोशल मीडियावर टाकू लागल्याने भयभीत झालेले सर्वसामान्य नाशिककरही ओरड करु लागल्यावर शहर पोलिसांनी दिवाळीआधीच फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे.गल्लीबोळातील कोणी गावगुंड नाही तर, या शहराचे बाॅस आपणच असल्याचे पोलिसांनी दाखवून दिल्याने राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली पोसलेल्या गुन्हेगारांना आता धडकी भरली असेल. त्यामुळेच धास्तावलेले गुंड अज्ञातस्थळी गायब झाले असून काही जण कारवाई आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून मुंबई गाठत असल्याची चर्चा आहे. नाशिकच्या राजकारणावर वर्षानुवर्षे दबदबा ठेवणारे मात्र गुन्हेगारी क्षेत्रात देखील आपले नाव कायम राखणारे त्याचबरोबर आता राजकारणात आलेले मात्र आपल्या गॉडफादरच्या मागेपुढे धावणारे, बॅनरवर फोटो टाकून रुबाब गाजवणाऱ्या सर्वच भाईंचे धाबे दणाणले आहेत.त्याउलट नाशिककर कित्येक महिन्यांपासून पोलिसांचे हे रुप पाहण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होते आणि उशिरा का होईना, नाशिक पोलिसांना जाग आल्याने त्यांच्या कडक कारवाईचे नाशिककरांनी स्वागतच केले आहे.पूर्वीच्या सर्व केसेस मिटवत राजनेता म्हणून मिरवणारे देखील पोलीस आयुक्तांच्या धाकाने बिळात लपल्याची चर्चा आहे.तर काही गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांना मोक्का नावाचा कायदा छळू लागल्याने त्यांनी आपल्या गॉडफादरकडे धाव घेतल्याचे कळते. नाशिकची गुन्हेगारी ही कायमच राजकीय पाठबळामुळेच फोफावल्याचे वारंवार उघड झाले आहे. गुन्हेगार हा कायमच आपल्या बचावासाठी सत्ताधारी पक्षाशी सलगी करीत असतो. त्यामुळे साहजिकच जे सत्तेतील पक्ष असतात, त्यांच्याकडे गुन्हेगारी कारवायांशी संबंधित मंडळींची मोठी रांग असते. कधी सामाजिक कार्यकर्ता, कधी नगरसेवक या सारख्या वेगवेगळ्या रुपात ही मंडळी वावरत असतात. मात्र यांच्यावर पोलिसांचा अंकुश हवा अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये असते जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आपले उग्र रूप गुन्हेगारांना दाखवले तर सामान्य जनता त्या पोलीस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे तत्कालीन आयुक्त विष्णुदेव मिश्रात्याच्या काळात झालेला एन्काऊंटर नागरिकांच्या लक्षात राहिला तर टिप्पर गँगला धडा शिकविणारे कुलवंतकुमार सरंगल असोत. किंवा भूमाफियांविरुध्द कठोर कारवाई करणारे दीपक पांडे असोत. नाशिकच्या सामान्य जनतेने यांना आयडल मानलं होत.असो उशिरा का होईना पोलीस आयुक्तांनी आपले उग्र रूप दाखवले यामुळे शहरातील नामचीन गुंड व राजकारणातील गुंडांममध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आणि पोलिसांचा हा धडाका कायम असाच सुरू असावा हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा

Loading

Previous Post

नाशकात आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या दोन घटना

Next Post

नाशकात भाजपनंतर शिंदे गटाचे नेते पोलिसांच्या रडारवर, थेट गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White