“सी-व्हिजिल” वर चार तक्रारी प्राप्त

नाशिक : आदर्श आचारसंहिता भंगा बाबतच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप उपलब्ध करून दिले आहे. नाशिक मधून या ॲपवर आतापर्यंत चार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाकडून या चारही तक्रारीची तातडीने दखल घेत योग्य ती कारवाई केली आहे. नियमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच त्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी तत्पर असतात मात्र या व्यतिरिक्त ऑनलाईन पाहणी करताना थेट नागरिकांनीच निरीक्षकांच्या भूमिकेत येत हरकत नोंदविण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सी व्हिजिल ॲप नावाचा एक ॲप तयार करण्यात आला आहे आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यासाठी या ॲपवर फोटो अथवा चित्रीकरण करून त्याद्वारे तक्रार केल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येते.
![]()














