क्रेडिट कार्ड, एनपीए लॉंग इनपासून होणार बदल

नवी दिल्ली :मार्च महिना संपत आला आहे.एक एप्रिल पासून अनेक बदल होऊ घातले आहेत, एनपीए लॉग इन पासून ते क्रेडिट कार्डच्या नियमापर्यंतचे अनेक बदल समाविष्ट आहेत. निवृत्तीवेतन यंत्रणेच्या लॉग इन पासून ते स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमा पर्यंतचे बदल एक एप्रिल पासून होणार आहेत. निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने एनपीएस खातेधारकांना सायबर घोटाळ्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लॉग इन सिस्टीम मध्ये बदल केलेले आहेत. बदलाचा हा नियम 1 एप्रिल पासून लागू होईल. खात्यात लॉग इन करण्यासाठी खातेधारकांना युजर आयडी आणि पासवर्ड आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य ठरणार आहे. थोडक्यात एनपीएसमध्ये आधार बेस्ड लॉक इन ऑथेंटीकेशन लागू होणार आहे. स्टेट बँक हे क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंट वर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट एक एप्रिल पासून बंद होतील. एसबीआय कार्ड प्लस, एसबीआय कार्ड एलिट ,एयुआर युएम सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्ड बाबत या सवलती बंद होत आहेत आयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्ड नियमात बदल होत आहेत एका तिमाहीत 35 हजार रुपयांवर खर्च केल्यास ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाऊजचे ॲक्सेस मिळणार आहे. येस बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी चालू आर्थिक वर्षातील एका तिमाहीत किमान दहा हजार रुपये खर्च केल्यास विनामूल्य देशांतर्गत एअरपोर्ट लाउंजचा एक्सेस देण्याचा उपक्रम सुरू आहे.
![]()














