संशयितांची संख्या पोहचली पंधरावर

नाशिक : 19 मार्चच्या रंगपंचमीच्या दिवशी शहरातील बोधलेनगर जवळ असलेल्या आंबेडकरवाडीच्या परिसरात टोळक्याने उमेश जाधव, प्रशांत जाधव या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली होती यादरम्यान सुरू असलेल्या तपासावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोर्चा देखील काढला होता. याची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी “एसआयटी”ची स्थापना केली होती. त्यानंतर जलदगतीने सुरू झालेल्या तपासात या गुन्ह्यातील आठवा संशयित रिक्षाचालक निलेश शांताराम महाजन यास ताब्यात घेऊन हल्ल्यात वापरलेले कोयते पोलिसांनी जप्त केले. मात्र या गुन्ह्यासाठी संबंधित पुरावे नष्ट करण्यात सहभाग घेतलेल्या चार महिलांसह एका पुरुषाचा सहभाग या पथकाने निष्पन्न केला आहे.यामध्ये कोयते वेगवेगळ्या घरांमध्ये लपवून वेळोवेळी त्यांच्या जागा बदलण्याचा प्रयत्न या महिलांनी केला असून यामध्ये तिघा आरोपींच्या पत्नीसह एकाच्या आईचा देखील समावेश असल्याचे समजते. जाधव बंधूंच्या दुहेरी खुनातील संशयित सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, सचिन विष्णू रेडेकर, अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे, योगेश चंद्रकांत रोकडे, योगेश मधुकर गरड, मंगेश चंद्रकांत रोकडे, निलेश शांताराम महाजन, रुपेश दिलीप रोकडे हे मध्यवर्ती कारागृहात आहेत

![]()















