• Latest
  • Trending
नाशकात कारचालकाचा प्रताप

नाशकात कारचालकाचा प्रताप

April 24, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात कारचालकाचा प्रताप

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

सिग्नल सुरू असताना दुचाकी बाजूला केली नाही म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरात एका मस्तवाल कारचालकाने अगदी किरकोळ कारणावरून दुचाकी स्वाराला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अलीकडे असलेल्या एका सिग्नलवर प्रेम प्रफुल्ल बोंडे (२१, रा. सिटी मॉलच्या मागे, संभाजी चौक, उंटवाडी) प्रेम व त्याचा आतेभाऊ आर्यन रविवारी (दि.२०) रात्री नऊच्या सुमारास दुचाकी (एमएच ०४ इके ७३४५)वरून त्र्यंबकरोडने जात होते. ते हॉटेल सिबल येथील सिग्नलवर थांबले होते. यादरम्यान सिग्नल लाल असल्याने तो हिरवा होण्याची प्रतीक्षा दुचाकी चालक करत असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या कार (15 जेए 5558) चालकाने जोरजोरात हॉर्न वाजविला. मात्र दुचाकी चालकाने दुचाकी बाजूला घेतली नाही. यादरम्यान कारचालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू केला. मुख्य म्हणजे दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केले होते त्या हेल्मेटमध्ये कॅमेरा देखील बसविलेला होता. यावेळी कारचालकाने पाठलाग करत सुरवातीला पोलीस अकादमीसमोर दुचाकीला कट देत खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा काही मीटर अंतरावर त्याने असाच प्रयत्न केला. त्यावेळी देखील दुचाकीस्वार व त्यांचा भाऊ थोडक्यात बचावले अखेर दुचाकीस्वाराने रस्ता बदलत एबीबी सर्कलकडून दुचाकी उंटवाडीच्या दिशेने नेली. तरीदेखील कारने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याने ठक्कर डोमजवळच्या वळणावर पुन्हा कट मारला मात्र याठिकानी देखील ते बालबाल बचावले मात्र उंटवाडी सिग्नलजवळ त्यांची दुचाकी पोहचल्यावर तर त्याने थेट कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला अखेर दुचाकीला कारची धडक बसली .त्यामुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये दुचाकीवरील आर्यन यास दुखापत झाली याप्रकरणी गंगापूर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान धडक दिल्याने कारच्या नंबर प्लेटचे नुकसान होऊन तुकडे पसरले होते. यावेळी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्याचे आवाहन होतेच मात्र पोलिसांनी नंबर प्लेटचे तुकडे जोडत नंबर प्लेट तयार करून प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती घेतली. यादरम्यान कार चालकाचा शोध लागला असून संशयित कारचालक शाहरुख फारूक शेख (30 रा खडकाळी) यास अटक करण्यात आली आहे.दुचाकीस्वाराच्या हेल्मेट मध्ये कॅमेरा असल्याने सर्व घटना त्यात कैद झाली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक पवार करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, गुन्हे शोध पथकासह भद्र्काली पोलिसांनी केली.

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही…….संशयित शाहरूख शेख याने वेगवेगळ्या संघटनांचा पदाधिकारी असल्याचा बनाव केला. सुरुवातीला त्याने अपघात माझ्याकडून झाला नसल्याचे सांगितले. त्याला व्हिडीओ आणि कारची नंबरप्लेट दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात क्षणिक राग कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
जग्वेंद्रसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर

Loading

Previous Post

प्रियकराला मिठी आणि आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

Next Post

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे कठोर निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White