• Latest
  • Trending
परिसरातील वर्चस्वातून दोघा भावांना संपवल्याची चर्चा

परिसरातील वर्चस्वातून दोघा भावांना संपवल्याची चर्चा

March 20, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

परिसरातील वर्चस्वातून दोघा भावांना संपवल्याची चर्चा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पाच संशयितांना पोलिसांनी केले गजाआड

नाशिक : शहरात रंगपंचमी शांततेत साजरी होत असतानाच रात्री 10 वाजेच्या दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणे रोडवर असलेल्या बोधलेनगर जवळपास आंबेडकरवाडीत सराईत गुन्हेगारांनी दोघा सख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यादरम्यान परिसरात मोठा जमाव देखील जमला होता .पोलिसांनी काही तासात सूत्रे फिरवत संशयितांना गजाआड करण्यात यश मिळविले. मिळालेल्या माहितीनुसार उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव (वय 32) व त्यांचे लहान भाऊ प्रशांत भगवान जाधव (वय 30) असे हत्या करण्यात आलेल्या भावांची नावे असून यामध्ये उमेश जाधव हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.मृत जाधव यांचे मामा विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊ वाजता आंबेडकरवाडी परिसरात बनकर चौक पिठाच्या गिरणीजवळ उमेश जाधव व प्रशांत जाधव तसेच त्यांचे सहकारी मित्र हे आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासाठी चर्चा करत होते. यादरम्यान उमेश जाधव यांना घरून फोन आल्याने ते सार्वजनिक शौचालयाजवळून घरी परतत असताना त्यांना संशयितांनी कुरापत काढून चाकू, काेयता व कुकरीसदृश हत्यारांनी त्यांच्यावर सपासप वार केले. हे पाहून भावाला वाचवण्यासाठी प्रशांत हा धावून आला. तेव्हा शस्त्रधारी मारेकऱ्यांनी उमेशसह प्रशांतवरही प्राणघातक हल्ला चढवला. कोणी मध्ये आला तर संपवून टाकू, अशी धमकी मारेकऱ्यांनी दिल्यानं जाधव बंधू यांच्या सोबत असलेले सहकारी दहशतीनं बाजूला झाले. उमेश आणि प्रशांत यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाल्यानंतर मारेकरी दुचाकीनं पळून गेले. त्यानंतर जाधव बंधूंना सहकाऱ्यांनी खासगी आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.हत्येच्या घटनेनंतर आंबेडकरवाडीत तणावाचं वातावरण आहे. जाधव बंधूंचं निधन झाल्याचं समजताच जिल्हा रुग्णालयात शोकाकूल नातेवाईक तसेच मित्र परिवाराची गर्दी उसळली. पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्रं हलवली. रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले आहे.

वर्चस्वातूनच दोघा भावांना संपवल याबाबत मृत जाधव बंधूंचे मामा विनाेद पवार यांनी संशयित सागर मधुकर गरड (वय ३२वर्षे, रा- आंबेडकरवाडी उपनगर), अनिल विष्णू रेडेकर (वय-४० रा- उत्तरानगर, तपोवनरोड, नाशिक), सचिन विष्णू रेडेकर(वय-४४, रा. गायत्री नगर, पुणेरोड, नाशिक), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे(वय-२६, रा- सर्वेश्वर चौक, उत्तमनगर, नवीन सिडकाे) व योगेश चंद्रकांत रोकडे(वय-३०, रा आंबेडकरवाडी) यांच्याविराेधात उपनगर पाेलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.मागील वादाची खून्नस, राग आणि आंबेडकरवाडीतील  वर्चस्व सिद्ध करण्याच्या चढाओढीतून हा खून झाल्याचे पवार सांगतात.त्याचबरोबर मारेकऱ्यांची आंबेडकरवाडीत दहशत असून जाधव बंधू यांच्या समवेत त्यांचा यापूर्वीही वाद झाला. त्यातूनच हा हल्ला झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Loading

Previous Post

दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं !

Next Post

वाढती गुन्हेगारी वेळीच ठेचा अन्यथा….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White