• Latest
  • Trending
हलके मे मत लेना एकनाथ शिंदे यांचा इशारा

हलके मे मत लेना एकनाथ शिंदे यांचा इशारा

February 15, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

हलके मे मत लेना एकनाथ शिंदे यांचा इशारा

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

निवडणुकीतील यशाबद्दल मानले नाशिककरांचे आभार

नाशिक : शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कुणाचेही नाव न घेता शिंदे यांनी ठाकरे गटावर व संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. मला महादजी शिंदे पुरस्कारमिळाल्यावर अनेकांना पोटदुखी झाली. माझी लाईन पुसण्यापेक्षा माझ्यापेक्षा अधिक काम करून दाखवत तुमची लाईन मोठी करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. तुम्हाला नेते कार्यकर्ते का सोडून जात आहेत ?याचा विचार करा. कार्यकर्त्यांना घरगडी समजू लागल्यामुळेच सर्व तुम्हाला सोडून जात आहेत. शोले तील असरानीप्रमाणे तुमच्या मागे कुणीच उरणार नाही असा इशारा देखील शिंदे यांनी दिला. मोगलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे व ते बिचकायचे तसेच विरोधकांना सर्वत्र एकनाथ शिंदे दिसतात. मात्र नागरिकांनी विधानसभेत विरोधकांना घरी बसवले. आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा दावा करत शिवसेनेकडे अन्य पक्षातून सुरू असलेला प्रवेशाचा ओघ असाच सुरू राहील. माझ्याकडे येणाऱ्यांचे मी स्वागत करतो. असेही शिंदे म्हणाले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून दाखविण्याचा शब्द मी खरा करून दाखविला. ‘एक बार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता’ अशी फिल्मी डायलॉगबाजी करत मला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेणाऱ्यांचे काय होते ते अवघ्या महाराष्ट्राने बघितले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकना‌थ शिंदे यांनी ठाकरेंबरोबर भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही गर्भित इशारा दिला. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना कायमचे घरी बसवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकीत यश मिळाल्याबद्दल त्यांनी नाशिककरांचे आभार मानले.यावेळी व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, आ. सुहास कांदे, मीना कांबळी, ज्योती वाघमारे, माजी खासदार हेमंत गोडसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

Loading

ShareTweet
Previous Post

उपमुख्यमंत्री शिंदेचा नाशिकमध्ये आभार दौरा

Next Post

नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White