रविवारी येणार कमी दाबाने पाणी

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण बंद राहणार असल्याने संपूर्ण शहराचा (दि 1 फेब्रुवारी) शनिवारी दिवसभराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. सब स्टेशन पंप हाऊस मधील विद्युत विषय कामे व इतर संबंधित कामे केली जाणार असून त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . मनपाच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडर वरून 33 केव्ही एच.टी वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे सदर पंपिंग द्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र यांना पाणीपुरवठा करण्यात येतो तसेच मुकणे रोटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमंड सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडर वरून जॅकवेल साठी 33 के.व्ही वीजपुरवठा कार्यान्वित आहे. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे नवीन बीपीटी चे काम सुरू असून सदर कामात अडचणीचे ठरणाऱ्या 33 केव्ही ओव्हर हेड एच.डी लाईनची महावितरण कंपनीच्या उपस्थितीत शिफ्टिंग करणे व त्या अनुषंगाने सब स्टेशन पंप हाऊस मधील विद्युत विषय कामे व इतर संबंधित कामे केली जाणार आहेत तसेच मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सर्व स्टेशन पंप हाऊस मधील विद्युत विषय कामे इतर संबंधित कामे वीज जलशुद्धीकरण केंद्र येथील सब स्टेशन मधील कामे व स्मार्ट सिटी अंतर्गत शट डाऊन अंतर्गत फ्लो मीटर बसविणे व विविध कामे मनपातर्फे आयोजित आहेत त्यामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण येथून सदर कालावधीत पंपिंग करता येणार नाही याची नागरिकांनी नोंद घेऊन मनपा सहकार्य करण्याची आव्हान पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

![]()















