वेटरवर रोखली होती सर्व्हिस रिव्हॉल्व्हर

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील एका हॉटेलमध्ये ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार व आमदारांचे अंगरक्षक असलेले विशाल झगडे हे जेवणासाठी गेले असताना पोळी नसल्याचे वेटर शेख याने सांगितल्याने विशाल झगडे यांनी वेटर शेख सोबत वाद घालत कंबरेला असलेली पिस्तुल काढून शेख याच्यावर रोखत मला रोटी हवी तू तिकडे काहीही कर असा दम भरला त्यानंतर हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असता झगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गंभीर दखल घेत विशाल झगडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली त्यांची ही वर्तवणूक पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असून शस्त्र अधिनियमाचा भंग करणारी असल्याने त्यांची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. झगडे शासनाकडून आमदार कांदे यांचे अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

![]()












