• Latest
  • Trending
नायलॉन मांजा आणि बापांवर गुन्हे दाखल

नायलॉन मांजा आणि बापांवर गुन्हे दाखल

January 14, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नायलॉन मांजा आणि बापांवर गुन्हे दाखल

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

पोलिसांची धडक कारवाई, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक : नायलॉन मांजामुळे पशु-पक्षांबरोबरच नागरिकांचे जीव देखील धोक्यात येत असून काही दिवसांपूर्वी तरुणाचा गळा चिरल्याने 75 टाके पडले असून अशा घटना रोज घडत असताना अनेकांना या नायलॉन मांजामुळे जीव देखील गमवावा लागला आहे . यादरम्यान धोकादायक मांजा वापरणाऱ्या मुलाबरोबर पाल्यावर देखील कारवाईची मागणी “ब्लॅक अँड व्हाईट” न्यूज च्या माध्यमातून करण्यात आली होती. काल सायंकाळी मधूबन कॉलनीत पित्यावर नायलॉन मांजा मुलाला उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अमृतधाम भागातील पिता-पुत्रावर अशाच प्रकारे आडगाव पोलिसांनी कारवाई करत पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन मांजाची विक्री वापरावर पोलीस आयुक्तांकडून बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील या मांजाचा वापर केला जात असल्याचे मिळून आले आहे. विक्रेत्या पाठोपाठ आता पोलिसांनी मांजा वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करत धडक मोहीम राबविली आहे रविवारी दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 33 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यापैकी नऊ अल्पवयीन आहेत. पोलिसांनी 21 जणांना अटक करून न्यायालयात हजर केली. आठ आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी आणि 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाच बापांना मुलांचा नायलॉन मांजाचा हट्ट पुरविणे अंगलट आले आहे. इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी फाटा येथील कोळीवाड्यात संशयित मनोज शिंदे याला घराच्या गच्चीवरून ताब्यात घेतले. शिंदे हा पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करताना पोलिसांना सापडला. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या ताब्यातून दोन हजार रुपयांची नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पवन नगर भागात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या प्रथमेश रवींद्र दाभाडे यास अटक केली आहे त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला असून त्याच्याकडून एकूण 34 हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजा आणि 34 गट्टू जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक रोड परिसरातील आम्रपाली इंदिरानगर झोपडपट्टी येथे पोलिसांनी जाऊन चौकशी व तपासणी केली असता अमोल काळे यांच्याकडे नायलॉन मांजा आढळून आला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकार वाडा पोलिसांनी रविवार कारंजा येथील होळकर पुलाजवळ कारवाई करत संशयित ज्ञानेश्वर साबळे यांच्याकडून सुमारे 16 हजार दोनशे रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 16 गट्टू जप्त केले आहेत त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिक पोलिसांनी धडक कारवाई राबवत नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

Loading

Previous Post

आमदारांचा अंगरक्षक निलंबित

Next Post

वेदनादायक, नायलॉन मांजामुळे तरुणाने गमावला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White