मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयितांना केले गजाआड

नाशिक : थर्टी फर्स्ट च्या रात्री एकीकडे जल्लोष सुरू असतानाच नाशिक शहरात मात्र थर्टी फर्स्ट ला गालबोट लागत खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उंटवाडीरोडवरील क्रांतीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास लक्ष्मण घारे (34, रा. क्रांतीनगर) याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. उंटवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात मद्य पिण्यासाठी आलेल्या टोळक्याने लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकून ठार केले. तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून हल्लेखोर तेथून फरार झाले होते. माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथके रात्रीच रवाना झाली होती. अंमलदार प्रशांत मरकड विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित शुभम हा पेठरोड परिसरात येणार असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना त्यांनी याबाबत कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विशाल देवरे, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, आधीच्या पथकाने सापळा रचला असता तो जाळ्यात अडकला यावेळी खुनातील मुख्य सूत्रधार गणेश भावसार या संशयित आरोपीचा मुंबई नाका गुन्हे पथक शोध घेत असताना तो सार्वजनिक बांधकाम भवनाच्या इमारतीवरून उडी घेत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या त्याने मयत लक्ष्मण हा संशयितांना सतत मारहाण करत धमकावयाचा याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने त्याचा काटा काढत खून केल्याची कबुली दिली. यामध्ये संशयित आरोपी शुभम विठ्ठलराव मिरके, अरुण बाळू वळवी, रिझवान रईससुद्दीन काझी यांना मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या 12 तासात गजाआड केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

![]()












