• Latest
  • Trending
मुलाला ओढत नेणाऱ्या “बिबट्याला” बापाने ठेवले धरून

मुलाला ओढत नेणाऱ्या “बिबट्याला” बापाने ठेवले धरून

December 27, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मुलाला ओढत नेणाऱ्या “बिबट्याला” बापाने ठेवले धरून

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

नाशिक : वडनेर विहित गाव रस्त्यावर वालदेवी नदीकाठी असलेल्या हंडोरे मळ्या परिसरात खेळत असलेल्या चार वर्षे मुलावर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने झडप घालत हल्ला केला मात्र वडिलांच्या प्रसंगावधानाने मुलाला जबड्यातून सोडत बिबट्याला अखेर पळ काढावा लागला. सायंकाळच्या सुमारास विहित गाव वडनेर रस्त्यावर हंडोरे मळा भागात पत्र्याच्या शेड बाहेर अंगणात ऋषिकेश प्रकाश चंद्रे हा चार वर्षीय मुलगा खेळत होता यावेळी त्याचे वडील प्रकाश चंद्रे हे देखील बाजूला वसलेले होते. अचानक पणे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने मुलावर झडप घेत त्याला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता बिबट्याचे पाठीमागील दोन्ही पाय ताकतीने धरून ठेवले.

त्यामुळे बिबट्याने जोरदार डरकाळ्या फोडत जबड्यातून मुलाला सोडले आणि प्रकाश चंद्रे यांच्या हातावर पंजा मारून धूम ठोकली. या दरम्यान तातडीने स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जखमी मुलाला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलाच्या गळ्याभोवती गंभीर जखम झाल्याने तिथून तातडीने पुणे महामार्गावरील उपनगर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वडाळा रोडवरील खाजगी रुग्णालयात मुलाला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल सुमित निर्मळ हे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले. जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत वन विभागाकडून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याच रात्री उशिरा शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुलाला हलविण्यात आले. विहितगाव वडनेर रोड तसेच सहा क्रमांकाच्या जकात नाक्याकडे जाणाऱ्या मळे भागातील रस्त्याच्या परिसरात बिबट्याचा संचार आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा वन विभागाकडे केली होती त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अद्याप बिबट्या कैद होऊ शकला नाही

Loading

Previous Post

मंगळसूत्र खेचणारे “अल्पवयीन” ताब्यात

Next Post

“थर्टी फर्स्ट”च्या रात्री नाशकात खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White