सहा लाखांचे सोने व दुचाकी जप्त

नाशिक : शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस ऍक्शन मोड मध्ये असून गेल्या दिवसात अनेक संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत असाच प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून गुन्हे शोध पथकाने परिसरात नाकाबंदी केली असता दोन दुचाकीस्वार अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले संशयावरून पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असल्याची कबुली त्यांनी दिली. यामध्ये सात गुन्हे उघडकीस आणण्यास उपनगर पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून 6 लाख 8 हजार 400 रुपये किमतीची 77.550 गॅम वजनाची सोन्याची लगड व एक लाख दहा हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 7 लाख 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे दुचाकीस्वार विनाक्रमांकाच्या पल्सरवर फिरत होते. काही दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन ओढण्याचा घटनेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता या दोघांचे वर्णन जुळले आहे. त्यामुळे हे दोघेही सोनसाखळी चोर असल्याची खात्री उपनगर पोलिसांना झाली पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सोनसाखळी चोरीची कबुली देखील दिली उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वेळा व म्हसरूळ हद्दीत एका महिलेचे मंगळसूत्र ओढून नेल्याची माहिती संशयितांनी दिली. सातपूर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा देखील एक गुन्हा उघडकीस आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, इरफान शेख, सूरज गवळी, सौरभ लोंढे, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड आदींनी केली

![]()












