राजकारणात अशक्य असे काहीच नाही

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला यावेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त ठेवण्यात आल्याने हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले आहे याचे सस्पेन्स आता वाढत चालले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सूचक विधान करत अजून एक जागा रिक्त असल्याचे सांगितले होते . नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी याबाबत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले की मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.मिटकरी म्हणाले की, मागे एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं. मात्र लोकसभेत चांगलं यश मिळालं आणि ते आले नाही. आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी ठेवली आहे. माझ्या माहितीनुसार ते लवकरच आमच्यात येतील. योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील. मंत्रीमंडळातील एक जागा त्यांच्यासाठीच राखीव असल्याचे मिटकरी म्हणाले तर मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नसल्याने ते राष्ट्रवादी पक्षात नाराज आहेत त्यामुळे त्यांचे एक विधान बुचकाळ्यात टाकणारे आहे ते म्हणजे “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना ” त्यामुळे भुजबळ भाजपात गेल्यास त्यांच्यासाठी भाजपने ते रिकामे असलेले मंत्रिपद राखीव तर ठेवले नाही ना ? असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे .राजकारणात काहाही अशक्य नाही हे गेल्या सहा वर्षात महाराष्ट्र बघतो आहे. शरद पवार यांचे खंदे समर्थक जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार या बातम्या लोकसभेच्या आगोदर देखील सुरू होत्या आणि विधानसभेनंतर देखील सुरू आहेत त्यामुळे कोण कुठे जाणार ते येत्या काही दिवसात महाराष्ट्र बघणारच आहे.

![]()












