• Latest
  • Trending
पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्याची खेळी  ?

पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्याची खेळी ?

December 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्याची खेळी ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाण्याची शक्यता

नाशिक : राष्ट्रवादीचे हेविवेट समजले जाणारे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात स्थान निश्चित मानले जात असतानाच अचानक भुजबळ यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे भुजबळ समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र झाले आहे. दरम्यान येवला मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून समर्थकांनी मेळावा आयोजित केला आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकच्या दृष्टीकोनातुन अनेक विकासकामे केली. विमानतळ, नाशिक मुंबई रस्ता, बोटक्लब अशी मोठी विकासकामे भुजबळांच्या काळात झाली. छगन भुजबळ हे आक्रमक नेते म्हणून परिचित आहेत. मंडळ आयोगावरून त्यांनी शिवसेनेसोबत पंगा घेतला आणि शिवसेना सोडत कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी मोठा लढा उभारण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. अलीकडेच राज्यात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ही भुजबळांची भूमिका राज्यकर्त्यांनाही चांगल्यापैकी उपयुक्त ठरली त्याचबरोबर मंत्रिपदावर व सरकार मध्ये राहून देखील छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट अंगावर घेत आपली भूमिका स्पष्ट केली. भुजबळांनी उपमुख्यमंत्रीपदापासून अनेक महत्वाची पदे भूषविल्याने त्यांचा दांडगा अनुभव पहाता त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. नाशिक जिल्ह्यातून नरहरी झिरवाळ आणि अँड माणिकराव कोकाटे यांना संधी देत भुजबळ यांना बाजूला सारण्यात आले मात्र भुजबळ यांना का डावलण्यात आले हे अस्पष्ट असून आगामी सिहस्थ बघता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांना नियुक्ती करताना छगन भुजबळ हे अडचणीचे ठरू शकतात व भुजबळ हे पालकमंत्रीपदावर दावा ठोकण्याची शक्यता लक्षात घेता हा संघर्ष टाळण्यासाठी व गिरीश महाजन यांचा रस्ता मोकळा ठेवण्यासाठीच छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्याची खेळी भाजपने राष्ट्रवादीच्या माध्यमातून खेळल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अजित पवार गट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी भुजबळ यांची नियुक्ती करून पक्षाची मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भुजबळांसाठी राज्यसभा हा पर्याय देखील पक्ष ठेऊ शकतो मात्र छगन भुजबळ यावर काय प्रतिसाद देतात अथवा काय भूमिका घेतात याकडे भुजबळ समर्थकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

भुजबळ नाराज तर समर्थकांचा संताप

Next Post

“आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना “

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White