नाशिक पोलीस त्या संस्थेच्या जमीन खरेदीचे व्यवहार थांबविणार

नाशिक : मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबर ओळख असल्याची बतावणी करत व मंत्र्यांसोबत असलेले फोटो दाखवत चेन्नई येथील रहिवासी व शास्त्रज्ञ असलेले नरसिम्हा रेड्डी यांना तुम्हाला राज्यपालपद मिळवून देतो असे म्हणत यासाठी पंधरा कोटी रुपयांची मागणी केली त्यानुसार नरसिम्हा व त्यांच्या नातेवाईकांकडून रोख स्वरूपात निरंजन कुलकर्णी यांने 60 लाख रुपये व उरलेले चार कोटी 48 लाख 99 हजार 876 रुपये थेट बँक खात्यात वर्ग करून घेतले. सलग दोन महिन्यात ही रक्कम त्याने उकळल्याचे फिर्यादी रेड्डी यांनी सांगितले आहे. त्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांच्या पथकाने तपासचक्र फिरवत नाशिकरोड येथील गंधर्वनगरी येथून निरंजन सुरेश कुलकर्णी याला जेरबंद करण्यात यश मिळविले. पोलीस तपासात कुलकर्णी याचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून त्याने नागपूरच्या एका सेवाभावी संस्थेला सुमारे तीन कोटी रुपये दिल्याचे उघडकीस आले असून या संस्थेने या पैशातून भूखंड खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. नागपूरच्या सेवाभावी संस्थेने जमीन खरेदीचे जे व्यवहार केले आहेत ते नाशिक पोलिसांकडून थांबविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. फिर्यादी नरसिम्हा यांच्याकडून निरंजन कुलकर्णी याने 15 कोटी रुपये घेतले होते नऊ कोटी रुपयांचे चेक रेड्डी यांनी बँकेतून थांबविले अन्यथा त्यांना पंधरा कोटींचा गंडा घालण्यास कुलकर्णी यशस्वी झाला असता त्याचप्रमाणे कुलकर्णी याच्या वडिलांचे बँक खाते पोलिसांनी तात्काळ गोठविले आहे.

![]()












