नाशकात 9.4 अंश सेल्सिअस तापमान

नाशिक : राज्यात थंडीमध्ये मोठी वाढ होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे येलो अलर्ट जारी केला आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 12 डिसेंबर पर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे राज्यामध्ये मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान जळगावत आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर नाशिकला 9.4 अंशावर तापमान होते सध्या उत्तरे कडील थंड वाऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा दहा अंशाखाली गेला आहे पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे राज्यात ढगाळ हवामान असून स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे. मंगळवारी किमान तापमानात दोन ते तीन अंशाची घट होत थंडी आणखीन वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य पश्चिम महाराष्ट्रात भारतात अधिक थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात थंडी कायम शहरात थंडीचा मुक्काम वाढला असून राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नाशिकला 9.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा थंडी भरली

![]()















