नाशिक शहरात महिनाभरात खुनाची दुसरी घटना

नाशिक : विधानसभेच्या निवडणुका संपून काही अवधी झालेला असतानाच नाशिक शहरात महिनाभरात खुनाची दुसरी घटना घडल्याने नाशिकची वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .काही दिवसांपूर्वी विडी कामगार नगर परिसरात काही मुले, महिला व पुरुषांनी तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकत धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना ताजी असतानाच उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात किरकोळ कारणावरून टोळक्याने हॉटेलचालक नितीन शंकर शेट्टी (38)याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. मयत नितीन शेट्टी यांची बहीण सोनाली चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी पथके तयार करत आरोपींच्या मागावर रवाना केली असतानाच गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीवरून वाघाडी नाल्याच्या परिसरात मेरीच्या लगत झाडा झुडपात संशयित लपून बसले असताना पथकाने पंचवटी गाठत सापळा रचला व चारही बाजूने घेराव घालत पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी पाठलाग करत पाच जणांना ताब्यात घेण्यात यश मिळविले. यामध्ये संशयित आरोपी रोशन अशोक निसाळ(23)गणेश यादव लाखन(31)नितीन दिलीप गांगुर्डे,(31) गोविंद सुभाष निसाळ (23) राजेंद्र लाखन (35) यांचा समावेश आहे. इडली-डोसा विक्रीच्या हातगाड्याला नितीन शेट्टी याने लाथ मारल्याने ‘रोजीरोटी’ ला लाथ मारली म्हणून त्यांचा राग अनावर झाल्याने सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढविला व ठार मारले त्यानंतर नितीन शेट्टीच्या घरावरही टोळक्याने दगडफेक करत हॉटेलची तोडफोड केली. संशयितांना गजाआड करण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर पाटील, सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक रोहिदास सोनार, राजू टेमगर, सचिन चौधरी, सागर जाधव, जुबेर सय्यद, फरीद इनामदार, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले श्रीकांत कर्पे यश मिळविले.

![]()












