कॉग्रेस सेवा दलाची मागणी

नाशिक : शासनाने नायलॉन मांजा विक्रीला बंदी घातली असली तरी काही दुकानदारांकडून छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा आणि मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेस सेवा दलातर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आले. नायलॉन मांजामुळे काही वर्षांपूर्वी एका महिलेची मान कापली जाऊन तिचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी वडाळा गावात सुद्धा नायलॉन मांजा शाळकरी मुलाच्या पायात अडकल्यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो मृत्युमुखी पडला होता. त्याचप्रमाणे नायलॉन मांजामुळे दरवर्षी मनुष्यासह पक्षांना देखील दुखापत होत असते. यामध्ये काही पक्षांचा मृत्यू होतो. तर अनेक पक्षी कायमचे जायबंदी होतात. निवेदन देता वेळी यकॉग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर, संतोष मुन्ना ठाकूर, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, स्वप्निल पाटील, अल्ताफ शेख, संदीप शर्मा, समीर कांबळे, सिद्धार्थ गांगुर्डे, जावेद इब्राहिम, संतोष शेवाळे, रोहन कातकडे, ईसाक कुरेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते


![]()












