जीव वाचविण्यासाठी मागितली खंडणी, गुन्हा दाखल

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत नाशकात गुन्हेगारी हा मुद्दा सर्वच पक्षांनी अग्रभागी ठेवत प्रचार केला होता .मात्र नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे चिन्हच दिसत नसून नाशकात व्यवसायासाठी घेतलेले 50 लाख रुपये परत न केल्याने एका व्यावसायिकाचे अपहरण करीत जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली. तब्बल नऊ दिवस त्या व्यावसायिकास डांबून ठेवण्यात आले त्याच बरोबर जीव वाचविण्यासाठी खंडणीची देखील मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश काळे (35,रा.सिन्नर फाटा) यांचा शेअर ट्रेडिंग चा व्यवसाय आहे काळे 2021 पासून कांतीलाल वामजा व त्यांचा मुलगा मिहीर वांजा या दोघांना ओळखतात त्यांनी काळे यांना व्यवसायासाठी 65 लाख रुपये दिले होते त्यामधून 50 लाख रुपये वामझा यांना परत देणे बाकी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्या रकमेसाठीच कांतीलाल वामजा यांनी तगादा लावला होता. 50 लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी वामजा पिता-पुत्रांनी गणेश काळे यांच्याकडे तगादा लावला होता. पैसे परत दया अथवा तुमच्या व्यवसायात आम्हाला भागीदार करा. अशी वामजा यांची मागणी होती. त्यामुळे गणेश काळे यांनी कांतीलाल वामझा यांच्यासाठी भागीदार पत्र तयार केले व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी मुंबई येथे सेबीच्या कार्यालयात दोन कोटी रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील असे वामझा यांना काळे यांनी सांगितले त्यानुसार वामझा यांनी रक्कम देण्याची तयारी दाखविली मात्र मंगळवारी दुपारी चार वाजता कांतीलाल वामझा यांनी काळे यांना त्या पोटी 25 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी त्यांच्या पाथर्डी फाटा परिसरातील गोवळाणे रोड येथील साइटवर बोलावले होते. त्यानुसार गणेश काळे व त्यांचा मित्र केतन सोनवणे असे दोघेही वामजा यांनी बोलावलेल्या साईटवर गेले दरम्यान वामजा हे काळे यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. वामजा यांनी काळे यांना फोन करून माझ्या पाठीमागे या असे सांगितले. त्यामुळे काळे यांनी केतनला गाडी थांबवायला लावली. गाडीतून उतरून मी पाच दहा मिनिटात येतो असे सांगून गणेश काळे पुढे निघून गेले त्यानंतर काळे पुढे चालत असताना व वामजा सोबत असलेले आकाश वानखेडे व इतरांनी काळे यांना घेरत मारहाण सुरू केली. तसेच त्यांचा मोबाईल हिसकून घेतला काम चालू असलेल्या साईटवरील एका गाळ्यात काळे यांना घेऊन जात शटर बंद करून डांबून ठेवत पुन्हा मारहाण केली. आमचे पैसे परत कर नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी ते वारंवार देत होते. अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता कांतीलाल वामझा व त्यांचा मुलगा मिहिर वामझा यांनी गणेश काळे यांना एक किलोमीटर दूर घेऊन जात त्या ठिकाणी मोबाईल देऊन नातेवाईक किंवा मित्रांना फोन करा आणि त्यांच्याकडून पैसे मागून घ्या असे गणेश काळे यांना सांगितले त्यानुसार गणेश काळे यांनी त्यांचा मित्र मिलिंद सोनवणे यास मला वीस हजार रुपये फोन पे वर टाक असे सांगितले त्यानुसार त्यांनी फोनपेवर पैसे टाकले लगेच गणेश काळे यांनी जयेश सोनवणे याचा फोन पे वर पैसे पाठविले त्यानंतर उर्वरित पैशांसाठी वामझा यांनी पुन्हा काळे यांना धमके देणे सुरू केले. काळे यांनी शेअर ड्रेडिंग मधून पैसे काढून देतो असे वामजा व वानखेडे यांना सांगितले. त्यावर वामजा यांनी काळे यांना तू जर पैसे दिले नाहीस तर तुझा गेम करू अशी धमकी दिली . त्याचबरोबर आकाश वानखेडे यांनी गणेश काळे यांना 5 लाख रुपये दिल्यास तुझी सुटका करू अशी ऑफरच काळे यांना दिली होती. दरम्यान आठ दिवस उलटल्यानंतरही गणेश काळे परत न आल्याने त्यांचा मित्र केतन सोनवणे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ही माहिती देत पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे कुलदीप पवार अमजद पटेल, देवरे यांना घेऊन साइटवर आले. यावेळी तिथेच डांबून ठेवलेल्या गणेश काळे यांची सुटका करण्यात आली. या ठिकाणी असलेले संशयित विनायक जाधव, उमेश सरवर, मुकेश शिंदे या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

![]()












