मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गितेंची मागणी

नाशिक : भाविकांचे शहर मंत्रभूमी ते तंत्रभूमी शैक्षणिक हब अशा विविध बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकची ड्रग्ज संस्कृतीमुळे महाराष्ट्रासह देशात बदनामी झाली आहे. शहरातील तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणाऱ्या माफीयांना सत्ताधाऱ्यांचा राज श्रय लाभला यातील सूत्रधार चिपड्याला जामीन मिळवून देऊन नंतर त्याचे सहकुटुंब स्वागत करणाऱ्या अशा बड्या भाभी ची कुटुंबासह नार्को टेस्ट करण्याची आक्रमक मागणी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी मध्य मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत गीतेंकडून आमली पदार्थ आणि भयमुक्त नाशिकच्या मुद्द्याला प्राधान्य देत भाजपवर निशाणा साधला आहे. जुन्या नाशिक मध्ये काढलेल्या रॅलीत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला गेल्या दहा वर्षात केंद्र राज्य व महापालिका असे एकाच पक्षाच्या हाती सत्ता असतानाही मुंबई पुणे नागपूर या शहरांच्या तुलनेत नाशिक भकास झाले आहे. येथील आमदारांनी शेवटच्या महिन्यात उद्घाटन करीत विकासाचा आव आणला परंतु नाशिककर सर्व जाणून आहेत हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण करणाऱ्या या आमदाराला मतदारांनी मतदानातून धडा शिकवावा असे आव्हान वसंत गीते यांनी केले आहे. त्याचबरोबर वडाळा परिसरात झालेल्या चौक सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.


![]()












