देवळाली मतदारसंघात होणार मैत्रीपूर्ण लढत

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि देवळाली मतदारसंघात सुरवातीपासून तर माघारीपर्यंत ट्विस्ट आले. सुरवातीला महायुतीमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना या मतदारसंघातील उमेदवारी घोषित झाली. तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टरने शिंदे गटाचे एबी फार्म आले आणि डॉ राजश्री आहिरे या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार झाल्या. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाकडून माघारीचे आदेश असताना देखील डॉ राजश्री अहिरराव या गायब होत्या त्यांचा मोबाईल नॉट-रीचेबल येत होता .शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या सचिवांच्या पत्रावर माघारी टाकत ते निवडणूक अधिकाऱ्यांना दिले मात्र त्यावर उमेदवाराच्या व सुचकाच्या सह्या नसल्याने अखेर राजश्री अहिरराव यांची उमेदवारी व चिन्ह कायम राहिले आणि त्यांचा देवळाली मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र यावर वरिष्ठ नेते निर्णय घेत नव्हते तर कार्यकर्त्यांच्या मते देवळालीत तीस वर्षांपासून शिवसेनेच वर्चस्व आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह टिकविण्यासाठी ही निवडणूक लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांचे हे मत जाणून घेतल्यानंतर माजी खासदार गोडसे यांनी पक्षश्रेष्ठीना कळवले दोन दिवसांनी पक्ष निर्णय देणार होता मात्र अद्याप निर्णय न झाल्याने अखेर देवळाली मतदारसंघासात शिंदे गटाच्या शिवसेनेने धनुष्य बाणाचा प्रचार सुरू केला असून आता देवळाली मतदारसंघासात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली


![]()












