विधिमंडळ अधिवेशनात प्रखरतेने मांडली होती भूमिका

नाशिक : शहराच्या मध्य मतदारसंघातुन भाजप महायुतीच्या उमेदवार विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार फरांदे यांच्यावर ड्रग्ज संदर्भात गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ड्रग्जमुक्त नाशिकसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी ड्रग्ज पेडलर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर्स, त्यासंदर्भातील पुरावे गृहखात्यास दिले. या प्रकरणाची गृहखात्याच्या माध्यमातून चौकशी देखील करण्यास सांगितली मात्र तरीदेखील विरोधक त्यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देवयानी फरांदे यांनी नाशिक ड्रग्जमुक्तीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला. विधिमंडळाच्या सलग चार अधिवेशनांमध्ये अतिशय प्रखरतेने मांडलेली भूमिका यामुळे ड्रग्जमाफियांना पळता भुई थोडी झाली होती. सलग चार अधिवेशनांमध्ये प्रा देवयानी फरांदे यांनी ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणे गरजचे असल्याचे ठासून सांगितले .शहरातील काही परिसरात असलेले अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या समाजकंटका विरोधात भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. शहरातील पक्षीय उमेदवारांचा अमली पदार्थ बाबत दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग नसल्याचे आढळून आलेले नाही असे दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे असे या पत्रकात म्हटले आहे.

![]()












