त्या खुनाच्या घटनेचा झाला उलगडा

नाशिक : शहरातील कचरा डेपोजवळ काल योगेश सुभाष बत्तासे ( वय 31, सातपूर) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. इंदिरानगर पोलिसांनी काही तासातच या घटनेचा उलगडा केला असून बायकोनेच मावस दिरासोबत कट रचत पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 एप्रिल 2024 रोजी बत्तासे यांच्या बहिणीचे लग्न असल्याने मावस भाऊ कृष्णा हा देखील पैठणला गेला होता. त्याची ओळख योगेश बत्तासेची बायको कोमलसोबत झाली. त्यानंतर योगेश, कृष्णा व कोमल हे तिघे म्हाडाच्या घरकुलात भाडेतत्त्वावर राहण्यास आले होते. योगेश हा पाथर्डी फाटा परिसरात मालवाहू वाहनावर वाहनचालक म्हणून काम करत होता. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत योगेशला कळाल्याने त्यांनी कोमलला पैठण येथे सोडले होते. त्यानंतर ते परत नाशिकला परत आले. यादरम्यान पार्टी करण्यासाठी कृष्णा हा योगेशला घटनास्थळी घेऊन गेला होता. कृष्णा व कोमल यांनी संगनमताने साथीदारांच्या मदतीने योगेशच्या खुनाचा कट रचला असल्याने पोलिसांनी सांगितले. योगेशला दुचाकी ने घेऊन जात मद्य पाजले मद्याच्या नशेत तो झिंगताच त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे त्याचा भाऊ पवन सुभाष बत्तासे यांनी पोलिसांना सांगितले


![]()












