हेलिकॉप्टर आणि एबी फार्मचा लाखो रुपयांचा खर्च त्या पक्षाच्या माथी

नाशिक : शहरात हेलिकॉप्टर त्यातून आलेले एबी फार्म आणि निवडणूक आयोगाने दिलेले चौकशीचे आदेश आणि नंतर उमेदवारच गायब झाल्याने हा विषय शहरात चर्चेचा ठरला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तासांच्या अगोदर धावपळ करत खास हेलिकॉप्टरने देवळाली विधानसभा मतदारसंघातील डॉ राजश्री अहिरराव यांच्यासह तीन उमेदवारांसाठी एबी फार्म मागवण्यात आले. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवार व विद्यमान आमदार सरोज आहिरे यांच्या समोरच महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने डॉ राजश्री अहिरराव यांना एबी फार्म दिल्याने हा चर्चेचा विषय झाला.यानंतर विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला यानंतर राज्यातील बदललेल्या समिकरणांच्या पार्श्वभूमीवर व झालेल्या सल्ला-मसलतीनंतर या उमेदवारांना शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. यातील दिंडोरीचे धनराज महाले यांनी माघार घेतली मात्र राजश्री अहिरराव यांचा फोन नॉट-रीचेबल येत होता .म्हणजेच अहिरराव यांनी पक्षाचा आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली. उमेदवारच गायब झाल्याने यावर उपाय म्हणून शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांचे स्वाक्षरी असलेले पत्र तयार करण्यात आले यामध्ये अहिरराव या माघार घेत असल्याचे नमूद करण्यात आले मात्र या पत्रावर उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जावर असलेले सूचक उपस्थित नसल्याने त्याचबरोबर विहित नमुन्यात माघारीचे पत्र आणि त्यावर सुचकाची स्वाक्षरी नसल्याने ही माघार अधिकृत नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी पक्षाच्या चिन्हासह कायम होती. तर दुसरीकडे हेलिकॉप्टरने आलेल्या एबी फार्मच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते यामध्ये जिल्हा प्रशासनाने चौकशी केली त्यात हेलिकॉप्टरने एबी फार्म आल्याचे समोर आले. मात्र या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नसल्याने हा संपूर्ण खर्च पक्षाच्या खात्यात गेला असून उमेदवाराच्या खर्चाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले नेमकं इतक्या मेहनतीने हेलिकॉप्टरने एबीफार्म आणण्यात आले .उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यानंतर
पक्षाचा आदेश ऐकत एका उमेदवाराने माघार घेतली, दुसरा उमेदवार गायब झाला मग पक्षाच्या सचिवांच्या नावाने पत्र दिले तरी उमेदवारी कायम राहिली इकडे निवडणूक आयोगाने चौकशी लावली लाखोंचा खर्च शिंदे गटाच्या शिवसेनेच्या म्हणजेच पक्षाच्या नावावर जमा झाला.मग इतकी मेहनत तरी
कशासाठी ? हाच प्रश्न सामान्य जनता,राजकीय धुरीण यांना नक्कीच सतावत असणार हे मात्र नक्की

![]()











