देवळालीत होणार अजित पवार गट व शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत

नाशिक : देवळाली मतदारसंघात एक मोठा ट्विस्ट आला असून महायुतीतील दोन मित्र चक्क एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शेवटच्या क्षणाला अगदी नाट्यमय घडामोडी झाल्यात आणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी समोर शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला . देवळाली मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असलेल्या सरोज आहिरे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या काही मिनिटे अगोदरच स्वेच्छानिवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जाला जोडण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून एबी फार्म देण्यात आला .मुख्य म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचा एबी फार्म शेवटच्या क्षणी चक्क हेलिकॉप्टरने आला. त्यामुळे आता महायुतीतील दोन उमेदवार मैत्रीपूर्ण लढत देणार असल्याचे चित्र आहे. याबाबत आमदार सरोज आहिरे यांनी हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला असल्याचे समजते गेल्या निवडणुकीत सहा जागा राष्ट्रवादी कडे होत्या आणि त्या जागा त्याच पक्षांकडे असतील असं महायुतीत ठरलं होतं त्यावेळी राष्ट्रवादीकडून सरोज आहिरे यांना उमेदवारी मिळाली होती त्यांनी त्यावेळचे शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांचा पराभव केला होता. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनाकडे याबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणतात ही जागा सुरवातीपासून शिवसेनेने मागितली होती. कारण तीस वर्ष शिवसेनेचे या मतदारसंघात प्रभुत्व आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या सांगण्यानुसार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला .

कोण आहेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार – राजश्री अहिरराव या तहसीलदार होत्या मात्र देवळाली मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्त घेतली यासाठी त्यांनी खूप आधीपासून तयारी केली होती. यादरम्यान त्यांनी सुरवातीला भाजप मध्ये प्रवेश केला मात्र ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अचानक शिंदे गटाच्या शिवसेनेकडून त्यांना एबी फार्म मिळाला

![]()











