मध्य मतदारसंघात सर्वाधिक बंडखोर

नाशिक : विधासभा निवडणुकीसाठी आज अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. नाशिक पूर्व मधून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गिते आणि नाशिक पश्चिम मधून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्य म्हणजे शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीला धक्का देत अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले नाशिक मतदारसंघासातील पूर्व, पश्चिम, मध्य, देवळाली या मतदारसंघातून तब्बल 62 उमेदवारांनी 86 अर्ज दाखल केले यामध्ये मध्य मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी 19 अर्ज दाखल केले पश्चिम मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले, देवळाली मतदारसंघात 15 जणांनी 27 अर्ज भरले यामध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या बंडखोरांचा समावेश आहे यांनी दाखल केले अर्ज सुधाकर बडगुजर (पश्चिम नाशिक ) ठाकरे गट शिवसेना, योगेश घोलप (देवळाली) ठाकरे गट शिवसेना, राजश्री अहिरराव (देवळाली) शिंदे गट शिवसेना, मुशीर सय्यद (मध्य नाशिक) वंचित आघाडी, रंजन ठाकरे (मध्य नाशिक) अपक्ष, गुलजार कोकणी (मध्य नाशिक) अपक्ष, रामदास सदाफुले (देवळाली ) अपक्ष, डॉ डी एल कराड (पश्चिम) अपक्ष

![]()











