लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असतानाच राज्यात विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विधासभेच्या मतदानाच्या दिवशी जास्तीत-जास्त लोकांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये,महामंडळे,मंडळे, सार्वजनिक उपक्रम,बँका आदीना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. निवडणुक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक जाहीर केली. त्यानुसार या निवडणुकीत २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. ही निवडणुक एकाच टप्प्यात पडणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील. या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने या व्यक्तीच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. तसेच पूर्णदिवस सुट्टी देता येणे शक्य नसल्यास अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचे सरकारने आस्थापनांना आवाहन केले आहे.

![]()












