कॉग्रेसच्या डॉ हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

नाशिक : महाविकास आघाडीत मध्य मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटला आणि या ठिकाणी ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंतराव गिते यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर कॉग्रेस पक्षात नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. या मतदारसंघातुन कॉग्रेसच्या इच्छुक उमेदवार हेमलता पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवण्याचा इशारा दिल्याने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य म्हणजे नाशिक शहरातील एक ही मतदारसंघ कॉग्रेसच्या वाट्याला न आल्याने कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. डॉ हेमलता पाटील म्हणतात मागच्या वेळी कुठलीही ताकद नसताना अगदी 12 दिवसांचा अवधी असताना मला पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला मी देखील तयारीला लागत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली यावेळी देखील पक्षाने मला तयारी करण्याचे आदेश दिले असताना कुठलीही पूर्व कल्पना न देता हा कॉग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडला गेल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असून कॉग्रेस पक्ष मैत्रीपूर्ण लढण्यासाठी तयार असेल व पक्षाने एबी फार्म दिला तर कॉग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल अन्यथा अपक्ष लढण्याची माझी तयारी झाली असल्याचे देखील डॉ हेमलता पाटील म्हणाल्या त्याचबरोबर काही महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका असताना 4 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ कॉग्रेसला सुटणे गरजेचे होते.

![]()











