मनसेच्या यादीत पश्चिम मतदारसंघातून दिनकर पाटील

नाशिक : काही दिवसांपूर्वी black and white news ने पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे अण्णा मनसेच्या संपर्कात असून ते भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी टाकण्यात आली होती ती आज खरी ठरली असून भाजपाच्या पहिल्याच यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपा कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असून यामध्ये नाराज असलेले दिनकर(अण्णा) पाटील यांनी आज मनसेच्या इंजिन मध्ये बसणे पसंत केले. आज सायंकाळी दिनकर पाटील यांनी मुंबई येथे राजगड निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.यावेळी त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांना मोठा ताफा होता .मनसेत प्रवेश करताच त्यांना मनसे कडून नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली . याआधी दिनकर पाटील यांनी भाजपा कडे लोकसभा उमेदवारीची मागणी केली होती मात्र भाजपने त्यांना त्यावेळी शांत केले मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिनकर पाटील हे “करो अथवा मरो” च्या भूमिकेत असल्यामुळे भाजपाची यादी घोषित झाल्यानंतर त्यांनी थेट मनसेचा झेंडा हाती घेतला. हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे इतर भाजपा पदाधिकारी काय भूमिका घेतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



![]()











