अनेक इच्छुक उमेदवार मनसेच्या संपर्कात,मोठी खेळी खेळण्याची शक्यता

नाशिक :लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाला पाठींबा दिला मुळात हा पाठींबा भाजपा पक्षाला नसून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हा पाठींबा मोदी यांना असल्याचा त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सांगितले होते .त्यानंतर मात्र मनसे महायुती बरोबर जाऊन विधानसभा निवडणुका लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मध्ये-मध्ये राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर जात असल्याने कार्यकर्ते व नागरिकांमध्ये समभ्रम निर्माण झालेला असतानाच राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केल्याने राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. यादरम्यान राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा करत अनेक ठिकाणी उमेदवारांची देखील घोषणा केली. निवडणुका घोषित होण्यापूर्वी नाशिक शहरात 4 मार्चला मनसेचा वर्धापनदिन, त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन सर्वच्या-सर्व 15 जागांची मागणी केली त्यानंतर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला यावेळी राज ठाकरे म्हणाले कामाला लागा, आपल्या पक्षात मोठ्या घडामोडी होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची नेमकी रणनीती काय असणार याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर मनसे नाशिक जिल्ह्यातून किती जागा लढविणार आहेत याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत नाशिक शहरातील मनसेचा इतिहास बघता नाशिकसह राज्यात दहा वर्षांपूर्वी राज ठाकरे यांची क्रेझ होती 2009 मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते यामध्ये नाशिक शहरातील तीन आमदारांचा समावेश होता यामध्ये नाशिक मध्य मधून वसंतराव गिते तर पूर्व मधून स्व अँड उत्तमराव ढिकले तर नाशिक पश्चिम मधून नितीन भोसले हे विजयी झाले होते आता वसंतराव गिते हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत तर नितीन भोसले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर स्व उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे मनसेतून भाजपा आले सध्या ते भाजपाचे आमदार आहेत. यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले होते. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातील सर्व 47 जागांवर मनसेने लढण्याचे संकेत दिले आहेत तर शहरातील चारही मतदार संघावर मनसे आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळते असून मध्य आणि पश्चिम मतदारसंघावर मनसेने जास्त फोकस केला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे नाशकात असताना इतर पक्षातील नाराज असलेल्या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यामुळे मनसेचे लक्ष बंडखोरांवर असून येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी होऊन अनेक इच्छुक मनसेच्या इंजीन मध्ये बसण्याच्या तयारीत आहेत. यामुळे राजकिय घडामोडी बदलणार असून मनसे किती जागांवर उमेदवार उभे करणार आहे याकडे राजकीय धुरीणांबरोबर कार्यकर्त्यांचे देखील लक्ष लागून आहे.


![]()











