कारवाई करण्याची ठाकरे गटाच्या शिवसेनेची मागणी

नाशिक : मध्य मतदारसंघातील मतदार यादीत नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या नावात मोठा घोळ असून हजारो बोगस नावे घुसवल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून यासंदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या मतदारसंघातील नावे समाविष्ट झाल्याने दुबार नावे कमी करण्यात यावी यासाठी पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात रिट पिटीशन अँड विवेक पंजाबी यांच्या माध्यमातून प्रथमेश गिते यांनी याचिका दाखल केली असून न्यायालयाने 22 तारखेस सुनावणी ठेवली आहे. प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याची मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा व निवडणूक अधिकारी डॉ शशिकांत मंगरूळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावेळी उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, बाळासाहेब पाठक, प्रवीण जाधव, आकाश खोडे, सरप्रित सिंग आदी उपस्थित होते.

![]()












