• Latest
  • Trending

तरीही त्यांना गाडून मी त्यावर भगवा फडकवेन…

October 12, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

तरीही त्यांना गाडून मी त्यावर भगवा फडकवेन…

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

भ्रष्टाचारी सरकारला मशाल चूड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहण्यास सुरवात झाली असून त्यानिमित्ताने ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर परंपरेप्रमाणे यावर्षी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा आज शिवतीर्थावर संपन्न झाला. यादरम्यान पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे,नेते संजय राऊत या सर्व नेत्यांनी भाषण करताना केंद्रातील एनडीए सरकार बरोबरच राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली यावेळी भाषणाची सुरवात करताना उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.आपल्यासमोर असलेली ही लढाई म्हणजे महाभारत आहे, पांडव पाच होते आणि कौरव शंभर. शकुनीमामा कोण तुम्हाला माहीत आहे. सुईच्या अग्रवार मावेल इतकीही जागा तुम्हाला देणार नाही अशी मस्ती कौरवांची होती. भाजपाचीही आज हीच भूमिका आहे. सुईच्या अग्रवार जमीन मावणार नाही पण ती अग्र तुमच्या कुठे टोचेल? आता तर तलवारी आहेत माझ्या समोर आहे. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली, महाराष्ट्रात यांना (भाजपा) कुणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही भाजपाला खांद्यावर घेतलं. आज आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका मी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सोडलेला नाही. भाजपाला लाथ घातली कारण त्यांचं गोमूत्रधारी हिंदुत्व मला मान्य नाही. मिंध्यांना सांगा बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. हे सगळे शेपूट हलवणारे आहेत. मी कुत्र्यांचा अपमान करणार नाही. आपण टाटांचंही श्वान प्रेम पाहिलं मी देखील कुत्र्यांवर प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, पण मी लांडगा प्रेमी नाही. हे सगळे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चाललं आहे असं उद्धव ठाकरे  म्हणाले.अब्दालींसारख्याच्या कितीही पिढ्या आल्या तरीही त्यांना गाडून मी त्यावर भगवा फडकवेन कारण मला तुमची साथ आहे. भ्रष्टाचारी सरकारला मशाल चूड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही .आज शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला त्याची पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळं शस्त्रं आहेत. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत. असं उद्धव ठाकरे  म्हणाले

Loading

Previous Post

वेगवेगळ्या आघाड्या, युत्या.. राग येत नाही का ?

Next Post

मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White